Tuesday 9 December 2014

Dost dost na raha......




कॉलेजची वेगळीच दुनियादारी
                                                          माझ्या या नव्या कॉलेजमध्ये एका मुलीने मला सहज विचारले अर्थात तिच्यासाठी सहजच...पण माझ्यासाठी अगदी विचार  करायला भाग पाडणारा प्रश्न ? तू बोलु शकतेस ना म्हणजेतू  मुकी आहेस का? मी २ मिनिटासाठी शांतच झाले.पुढे काही बोलली नसती तर खरंच हिला मी मुकीच वाटली असती मी हसून विचारल का ग ? असा का वाटला तुला त्यावर ती म्हणाली नाही  तुला कधी बोलताना पहिले नाही शांत असते झोपून असते.काही प्रोब्लेम तर नाही ना! BF शी भांडण वगेरे ? ती तिच्या जागी योग्य होती कारण सुरवातीच्या काही दिवसामध्ये ती ने मला बघितलंच नव्हत.
 मी हसत हसत म्हणाले असं काही नाहीये तुला वाटत असा तर अजिबातच नाही….  काय सांगणार  ह्या मुलीला माझ्या BMM च्या आयुष्यात म्हणजेच गेली ३ वर्षे  एक भलतीच दुनियादारी शिकून आले मी.  बघायला गेल तर शिल्लक साधारण भांडण  कॉलेजच्या ग्रुप मध्ये सगळ्याच होता.मात्र जीवाभावाचे मित्र ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच मित्र-मैत्रीनी  जेव्हा "मैत्री'  या शब्दाचा अर्थ सुध्दा समजूशकत नाही.तेव्हा जास्त वाईट वाटत.मी bmmच्या 1st year ला cr झाले माझ्या बडबडीच्या स्वभावामुळे लोकप्रिय ही झाले.कोणाशी भाडंण-तटा नसून वर्षाच्या सुरवातीलाच आमचा चांगला ग्रुप तयार झाला मात्र माझ्या नाटकाच्या प्रकटीसमुळे हळूहळू मी कॉलेजला ही कमी जाऊ लागले या अगोदर आमच्या ग्रुपने खूप मज्जा केली होती सर्वाना सोबत बसणे ग्रुप सोबत फोटोकाढणे,  मज्जा मस्ती फक्त माझ्या ग्रुप मधल्या सर्वासोबत माझ चांगल आहे.असचं  वाटत होता मला आम्हांला ओळखणाऱ्या किंव्हा शिक्षकांना  ही कधी मनात पण वाटल नसेल कि माझे best frnd असे ही असू शकतात आमची १st semister झाली आणि त्यात मला A GRADE  मिळाला .या सगळ्यापेक्षा थोडेच अगदी ४ते ५ % जास्त मार्क्स मिळाले .आनंद होता कि ग्रुप मध्ये सगळे पास झाले याचाच.मात्र हा आनंद  माझ्या एकटीचाच होता  कारण 3idiots प्रमाणे दोस्त अगर फेल हो जाये तो दुख होता है.! लेकीन दोस्त अगर 1st आ जाये तो ज्यादा दुख होता है माझ्या पहिल्या येण्याचा मानसिक धक्का बहुतेक त्यातला दोघा-तिघांना झेपला नसावा म्हणूचच  आमच्या  मैत्रीत फूट  पडण्यास सुरवात झाली।  माझ्या शंभुराजे नाटकाच्या शो मुळे कॉलेजमध्ये होणारी गडबड  मला समजलीच  नाही, आमचा रिझल्ट लागला पण  मी उशीर आल्याने मला या पैकी कोणाचे  ही मार्क माहित नव्हते त्यात yyy ही ह्या वेळी पहिली आली.
आणि zzz  दुसरा आला  [या पात्रांची नावे घेऊ शकत नसल्याने yyy आणि xxx नावे वापरत आहे }. आणि तिसरी म्हणजे मी .माझा आनंद तरीही तोच होता कारण अजूनही मला यांचा प्रॉब्लेम कळलाच नव्हता.या सगळ्याच्या वागण्यातील बदल मला स्पष्टपणे जाणवत होता. मात्र या सगळीकडे दुर्लक्ष करून माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट असेही मी साफ मनाने बोलली होती. मात्र झोल असा होता कि  या zzz ने त्यांच्या result ची कॉपी एडीट करून यावर zerox काढून खऱ्या मार्कांना लपवून झोल केला होता. त्याला जास्त मार्क्स मिळाले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्नत्यात माझ्यां पासून लपवून मी तिसरी आले आहे असे सांगितले, माझे best friend जर असे बोलता आहे तर का जाऊ मी कोणाला विचारायला कि कोणाचे मार्क्स किती आणि काय?  .आंधळ्या विश्वासाने yyy आणि zzz यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी गप्प बसले. पण त्यांना माझ्याशी खोटं बोलून मला कमीपणा दाखवून कोणता बदला घेयचा होता हे मला आज पर्यंत समजले नाही                                                                                                                .मात्र बातमी अथवा गुपित कधी ना कधी फुटणारच zzz ने केलेला काळा बाजार result चा झोल आणि वाहत्या गंगेत हात धुवून yyy ने सुद्धा माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला, मला जेव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा मी माझ्या जुन्या सवयीप्रमाणे मी खूप रडले .ही तीच लोक आहे ज्यांना मी माझे best friend best मानत होते या परीक्षा तर होतच असतात पण .आपली मैत्री आणि त्यावर असणारा विश्वास माझ्यासाठी महत्वाचा होता पण हा विश्वास ह्या सगळ्यानी  गमावला होता तरी सुध्दा खोटे का होईना माझ्यासमोर first आणि second आलेल्या या  दोघांनाही मी गिफ्ट तर देणारच होते.त्यांनाही माझ्यातील बदल समजू लागला आणि जाणीवही झाली असावी बहुतेक . जर  खोटा result बनवून हे कोणालाच कळणार नाही असा वाटणारे हे माझे बेस्ट frnds आत्ता काळजीत यायला लागले कारण   इतका कांड करून ही गोष्ट सगळ्या समोर आली तर yyy आणि zzz यांचे चमचे आणि हितचिंतकांचे काय होईल ? कारण यात माझा पूर्ण group होता. पण  या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आल्या आणि  दुध का दुध और पाणी का पाणी हो गयामग काय ! माझ्या समोर चूक कबुल करून एकमेकांच्या नावावर चूक ढकलनारे माझे best frnd ? H O D जवळ सांगू  नकोस बोलणारे माझे best frndS  ?आम्ही असं  केल कारण तू 1st आलीच तू c.r आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे फालतू कारण देणारे माझे best frnd ?संपूर्ण वर्गासमोर माझी माफी मागून माझ्या डोळ्यात आलेलं पाणी पाहणारे माझे best frnd…  सगळंच संपल मैत्री,नाती,विश्वास,आणि सुरू झाल.नव राजकारण मला तोडण्याचा  विचार करणारे माझे best frnd स्वत सुध्दा एकत्र राहू शकले नाही कोणी बँच सोडून गेल, तर कोणी तोंड काळ करून कॉलेजच सोडून गेला.  या सर्व गोष्ट समजून  घेण माझ्यासाठी खूपच कठीण होत्या .  शिक्षकांनी या प्रकाराला नाव ठेवली तर hod नी शांत रहा प्रकरण वाढवू नको असा सल्ला दिला मला ही आता या सगळ्यातून बाहेर यायचं होते.मात्र पुन्हा विश्वास ठेउन मैत्री करेल  असा तेव्हा कोणीच वाटत नव्हत पण देव सगळं  काही पाहतो शेवटी खर काय ते सगळ्यान समोर आलं
  जाता.जाता या प्रकरणातून मला काय मिळाल हे सगळ्यांना माहित आहेच. त्यानंतर माझ्या best frnd  शी मी काडीचा ही संबंध ठेवला नाही.आणि अशा फसव्या  राजकारण खेळणाऱ्या लोकांपासून लांबच राहण्याचे ठरवले माझ्यातली ही भीती अजूनही गेली नाही
 खर अशा लोकांसारखी माणसे मला पुढे नको देऊ रे देवा! हाच विचार करून सतत बडबड करणारी मी शांत होऊन गेले माझ्यातल्या याच भितीने मला मुकी केली आहे.
आज ही हा प्रसंग आठवला तर त्याआधी केलेली मजा मस्ती सगळं  काही आठवत पण दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक पण फुकर मारून पिणार हेच

1 comment:

  1. अता तुम्ही मानस ओळखायला शिकायला हव....

    ReplyDelete