Friday 5 December 2014

प्रवास.................

                                                                                                                                             लहानपणी खेळता खेळता कधी मोठे होतो ते समजत नाही, लहानपणी फक्त एकच काम खाणे, खेळणे, मज्जा मस्ती आपण कधी विचार तरी करतो का कि जन्मापासूनच आपला हा प्रवास सुरु होतो. बालपणात आधी बालवाडी कडे प्रवास मग ती अंगणवाडीआपल्या सोबत आई बाबा ची पण शाळा सुरु होते…. रोजचे क, , रोजची अ, , , खेळता बागडता बालपण कधी सरले हे काही कळलेच नाही…….                                                                                                                   वाढता वाढता पुस्तकांचे ओझे पाठीवर आले आत्ता प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये आलो. बाई गेल्या आणि मॅङम आल्या शाळा क्लास यामुळे हि मुला किती busy झाली हे आपण आजूबाजूला बघतोच। त्यात येते दहावी मग बारावी म्हणजे आत्ता पुढचा प्रवास सुरु होतो पहिली ते दहावी नंतर बारावी पाठीवरचे ओझे काही कमी होत नाही वाढता वाढता शाळा झाली हे काही कळलेच नाही। शिकता शिकता येते मग तारुण्या.. तारुण्यात आल्यावर प्रेमात पडतो, यावेळी मनात नुसता गोंधळ उठला असतो पाय ठेवायला दहा दगड असतात. कोणी बोलत, डॉक्टर हो तर कोणी बोलत वकील, अशा परिस्थितीतून जाऊन एकदाचा कॉलेज पूर्ण होऊन आपण तारुण्यात असता असता पुढच्या प्रवासकडे वाटचाल करतो. तारुण्य हरवून जाते आणि पाहता पाहता लग्नाच्या गाठीत आपण अडकतो.                                                                                              जो प्रवास आज पर्यंत एकट्याने केला असतो त्यात आत्ता सोबत एक सोबती असतो. भरपूर काम आशा आकांक्षा या सर्व विचारांनी थोडे बसू आणि बोलू  या साठी पण वेळ नसतो आजच्या या धकाधकीच्या जगात नुसता धावताना दिसतात लोक.  जीवन तरी आपले असले तरी त्यात आपली लोक आपली नाती यासाठी घर परिवार मुलांचा विचार एक नवी जवाबदारी आलेली असते.. या लग्न नंतर मुलांची शाळाआपली स्वप्न बाजूला राहून मुलांच्या भविष्याचा विचार सतत असतो. स्पर्धेच्या या युगात आत्ता आपण कुटुंबांसोबत धावत असतो. रोजच्या हजार जबाबदाऱ्या पूर्ण करून माणूस पुढे जात असतोच. आत्ता नव्या लग्नाचे गुलाबी दिवस जाऊन म्हातारपण आलेले असते. लोक अनेक वेळा बोलतात मुला मोठी कशी झाली समजलाच नाही. कारण प्रवासात सतत पुढची वाटचाल पाहताना मागे बघायचे राहूनच जाते. उद्याची काळजी आजची आजच करत असल्याने डोक्यावरचे केस कधी पांढरे होतात हे काही कळत नाही,                                                                                                                                                                                                              बोलता बोलता म्हातारपण कधी आले हे मात्र समजत नाही. धावणारे पाय आत्ता लगेच थकून जातात. चेहऱ्या वरचे तेज आत्ता हळू हळू कम झाले असते. बोलका स्वभाव आत्ता चिडचिडा झालेला असतो. ज्या मुलांसाठी संपूर्ण आयु्ष्य  वेचला असताना  आत्ता तीच मुला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात तरी सुद्धा जीवनाचा प्रवास हा संपला नसतो कारण हसता हसता रडायला कधी लागलो हे मात्र आत्ता समजतच नाही.. आत्ता वेळ आली असते ती प्रवास संपवून एका दुसऱ्या जगात जाण्याची आणि जगता जगता मरण कधी येते ते हि कधी कळत नाही….                             

No comments:

Post a Comment