Tuesday 2 January 2018

होय आम्ही सावित्रीच्या लेकी

होय आम्ही सावित्रीच्या लेकी असं घोषवाक्य महाराष्ट्रातील सगळ्याच मुलीनी बोलायला हवे. आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिलांना तिथं पर्यंत पोहचण्याचा मार्ग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिला आहे.

         जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव सातारा येथे त्यांचा जन्म  झाला. त्यावेळी समाजात मुलींना पुढे येण्यासाठी वाव नसताना ही अतिशय खडतर प्रवास करून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे महत्वपूर्ण कार्य सावित्रीबाईनी केले. एक काळ होता जिथे महिलांना शिक्षण घेण्यासाठी अडवले जात होते. समाजात त्यांना मानाचे स्थान नव्हते. स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार नव्हता. अशा वेळी समाजात महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. ज्या काळात महिलांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते, त्याच काळात महिलांचे शिक्षण अत्यंत महत्वाचे असल्याचे समजून १४ जानेवारी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु करण्याचे काम सावित्रीबाई आणि जोतीबा फुले यांनी केले. मुलींना शिक्षण देणे हे भयंकर पाप समजल्या जाणाऱ्या समाजाची मानसिकता बदलून मुलींना शिक्षित करणे, त्या काळात अवधड होते, तरी ही हताश न होता सावित्रीबाई फुले यांनी आपला लढा चालू ठेवला. आणि म्हणूनच आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. “स्त्रियांनी शिकावे” हे त्यांच्या सामाजिक कार्याचे ब्रीदवाक्य होते.
           सावित्रीबाईंचा आदर्श समोर ठेवून आपल्या समाजातील मुलींना पुढे शिक्षणासाठी तसेच भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे. दंगल सिनेमात मुली या कोणापेक्षा कमी नसून, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगाच्या पाठीवर त्या कोठेही यशस्वी होऊ शकता हे दाखवून दिले आहे. ‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के’ या टैगलाइन ने चित्रपटातील सर्वच मुलींनी सगळ्याचे लक्ष ओढून घेऊन सगळ्यांची वाहवाह मिळवली. आज सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक तसेच सगळ्यात क्षेत्रात महिलावर्ग आघाडीवर आहे. तरीही ग्रामीणभागात, अविकसित ठिकाणी, परंपरांच्या आड, महिलांना पुढे येण्यासाठी कष्ट करावे लागते. असे होऊ नये म्हणूनच महिलांना फक्त आपल्या पाठिंब्याची गरज आहे. आपल्या देशात गृहिणी ते मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा आदर्श घेऊन आपण महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.स्वामी विवेकानंद म्हणतात, स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या कल्याणाची शक्यता नाही. कोमल हैं कमजोर नही तू शक्तीका नामही तेरा नारी है सबको जीवन देणे वाली मौत भी तुमसे हारी है ! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करून, त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा मला पुढे जपता यावा, समाजातील प्रत्येक स्थरातील मुलींना मी मदत करू शकेल, असा मी सदैव प्रयत्न करेल.
अमृता आनप
Senior Political Consultant