Monday 9 March 2015

असा साजरा होतोय माझ्या देशात womens day....

.. लहानपणीच लग्नाच्या बेडीत अडकले मी, लग्नाचा अर्थ माहित नसताना, माझे घर सोडून जगले मी.. पती मेला म्हणून त्याच्यासोबत सती गेले मी. तो कसा हि असला तरी सगळे सहन करून जगले मी,…… असा साजरा होतोय माझ्या देशात womens day… मुलीना काय करायचे शिक्षण घेऊन हे ऐकत ऐकत वाढले मी.. चूल आणि मुल सांभाळ फक्त या आदेशावर जगले मी… मुलगी आहे म्हणून जन्माच्या आधीच मेले मी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मी त्यावरची काजळी हेच बघत जगले मी  असा साजरा होतोय। मनापासून एकावरच प्रेम केले तरीही चारीत्रहीन समजले गेले मी, हजार लफडी करून शेवटी आई- वडिलांच्या पसंतीने लग्न करणाऱ्या नराधमाची स्तुती होताना पहिले मी आज ही मुलगा बघायला आल्यावर मान खाली घालून उभी राहिले मी,, तुला काय आवडते ? तू काय करशील पुढे हे विचारायचे सोडून, तू किती कमावतेस पगार किती तुला? या प्रश्नांना आजही सामोरे जाते मी… असा साजरा होतोय माझ्या देशात womens day [ माझ्या छोट्याशा आयुष्यात आलेले काही मोठे अनुभव } amruta anap

Thursday 19 February 2015

.सुंदर लव स्टोरी

.....................सुंदर लव स्टोरी एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावून
बसलो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली.. "मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?" तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील? ... कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील? कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील? कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील? कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील? बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील, समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील, ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल, ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील, सांग तेव्हा काय करशील? कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताच मोबाइलवर लक्ष नकळत जाईल, पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकल्यासारखे नक्की वाटॆल... सांग तेव्हा काय करशील? मी नसेन तर, तुला चित्रपट रटाळ वाटेल, सुंदर धुनही बेकार वाटेल, पुस्तकही नाराज वाटेल, मनातून नक्की तळमळशील.. दिवसभर दुसर्यांच्या चाणाक्ष नजरेपासून लपशील, उगाच किनार्यावर माझी वाट बघशील... संध्याकाळी हुर-हुरशील, माझ्या आठवणीने बेचैन होशील... मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील, गर्दीतही एकटा राहशील, पुन्हा पुन्हा मागे पाहशील, मी नजरेस पडणार नाही, हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील कुठेतरी... तू लाख स्वत:ला रमवशील, दुसर्यांमध्ये स्वत:ला हरवशील, नवीन नात्यांना जोडशील.... पण खरच सांग ......... "काय मला विसरू शकशील???" हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले, आणि त्याने जोराची मिठी मारली तिला,, तो म्हणाला, "तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होते जनू मी शेवटचे श्वास मोजत होतो, तुला हरवण्याची कल्पनाच इतकी दुख देत होती तर तू खरच नसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन ग! काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू, एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू, खरच हृदयापासून तू मला हवियेस, आणि एक सांगू" ती बोलली काय.. तो म्हणाला " Sorry, I Love you" मित्रानो खरच हे प्रेम खूप नाजूक भावना असते त्याला जपून ठेवा, छोटीशी चूक ही जीवनभरचा पश्चाताप बनु शकते...