Monday 9 March 2015

असा साजरा होतोय माझ्या देशात womens day....

.. लहानपणीच लग्नाच्या बेडीत अडकले मी, लग्नाचा अर्थ माहित नसताना, माझे घर सोडून जगले मी.. पती मेला म्हणून त्याच्यासोबत सती गेले मी. तो कसा हि असला तरी सगळे सहन करून जगले मी,…… असा साजरा होतोय माझ्या देशात womens day… मुलीना काय करायचे शिक्षण घेऊन हे ऐकत ऐकत वाढले मी.. चूल आणि मुल सांभाळ फक्त या आदेशावर जगले मी… मुलगी आहे म्हणून जन्माच्या आधीच मेले मी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मी त्यावरची काजळी हेच बघत जगले मी  असा साजरा होतोय। मनापासून एकावरच प्रेम केले तरीही चारीत्रहीन समजले गेले मी, हजार लफडी करून शेवटी आई- वडिलांच्या पसंतीने लग्न करणाऱ्या नराधमाची स्तुती होताना पहिले मी आज ही मुलगा बघायला आल्यावर मान खाली घालून उभी राहिले मी,, तुला काय आवडते ? तू काय करशील पुढे हे विचारायचे सोडून, तू किती कमावतेस पगार किती तुला? या प्रश्नांना आजही सामोरे जाते मी… असा साजरा होतोय माझ्या देशात womens day [ माझ्या छोट्याशा आयुष्यात आलेले काही मोठे अनुभव } amruta anap