Wednesday 26 November 2014

भलाई का तो जमाना ही नही रहा...

       अगदी काल परवाची गोष्ट आम्ही दादर वरुन कल्याणला जायला निघालो. बायकाची तीच तीच ओरड, तुला दिसत नाय ! तुमचा पाय लागला, जा 1st क्लास मध्ये जाऊन बस, इथपर्यंत ते तुझ्या बापाची गाडी आहे का ? असे सर्व घिसेपिटे डॉयलॉग मारुन, वाटा काढत आम्ही रोज, म्हणजे मी आणि माझी मैत्रीण जागा पकडण्यासाठी धरपड करत असतो. गाडी आली आणि आम्ही बसलो, समोर अगदी सुशिक्षित, चांगल्या घरातल्या बायका होत्या, मी ही अगदी समोर बघून त्यांच्या गप्पा ऐकत होते. अर्थात बायका म्हटल्या तर जोरजोरात गप्पा होणार.
        तितक्याच रोज प्रमाणे लेडिज डब्यात संत्र्याची टोपली घेऊन एक बाई आली,सगळंयानी त्या बाईकडून संत्री विकत घेतली. अगदी मी आणि माझ्या मैत्रीणींनी सुध्दा, माझ्या समोरची बाई अगदी बिधासपणे संत्र्याचा आस्वाद घेत, त्यांचे साल गाडीच्या बाहेर, तर काही माझ्या पायावर टाकायला लागली, माझ्या मनात एक विचार आला सगळीकडे स्वच्छता अभियानाचे वारे वाहत असताना, इतक्या सुशिक्षित बाईला समज नाही, माझ्या पायावर पडणा-या त्या सालाचा राग नव्हता. मला मात्र बाहेरच्या देशात- विदेशात गेल्यावर आपण किती कौतुक करतो. त्यांच्या शहराचे, मात्र आपण गाडी मध्ये रेल्वे स्टेशनवर न विचार करता घाण टाकतो. म्हणून मी म्हणालेच काकू खाली नका टाकू हे बघा माझ्याकडे पिशवी आहे, मला द्या तो कचरा, त्यावर मात्र अतिशय सभ्य दिसणा-या काकू अडाणी बायकाप्रमाणे माझ्याशी भांडण करायला लागल्या. मी म्हणाले, “काकू मी तुम्हाला चांगलच सांगतेय, खाली घाण करण्यापेक्षा मला दया, मी पण खाऊन पिशवी मध्येच टाकत आहे ना!” मात्र त्यांना त्यांच्या पेक्षा वयाने लहान असणा-या मुलींने शिकवलेली शहानपण आवडले नसावे. त्यावर “तु कुठून आलीस मोठी शहानी चल जा मी करेल घाण, जा गाडी मधली सगऴी सत्र्यांची साल उचलून आण, मग बोल” त्यानंतर तर भाषेची पातळी सोडून बोलायला लागल्या. 
      त्याच्या बाजूच्या बायका ही कचरा आपआपल्या बॅगमध्येच टाकत होत्या. माझ्या बाजूने बोलणा-या अनेक होत्या. मात्र या बाईला एकाच पण ऐकायच नव्हत. अगदी शब्दिक चकमक सपंल्यावर मी म्हणाले, “काकू आपण शिकलेली लोक आहोत. आपणच घाण करणार तर स्टेशनवर फिरणा-या भिकां-याना, गर्दुल्याना बघितल्यावर शी, इइइइ...... करण्याची गरजच नाही!” 
       मात्र त्यांना मलाच शहानपणा शिकवायचा होता..... शेवटी डोंबिवली पण आल आणि त्याकाकू रुबाबात उतरल्या, संत्र्याची तीच साल पायाखाली चिरडून त्यांतर निघून गेल्या. मात्र तेव्हा त्या गेल्यानंतर त्यांच्या बाजूच्या आजी म्हणाल्या, “ती शिक्षिका होती.” मला हाच प्रश्न पडला ,जर ही बाई इतकी उदधटत, आणि जरा ही सामाजिकतेची जाणीव नसणारी होती, तर तिच्या हातून घडणारी पिढी कशी असेल???

शेवटी कल्याण आले आणि आजूबाजूच्या बायका बोलायला लागल्या, “अगं जाऊ दे. ध्यान नहीं देना का? असे खूप असतात.” मी मनात बोलले, “हो!! अभी तो भलाई का जमाना नहीं रहा........