Wednesday 13 March 2019

औरंगाबाद डायरी....

औरंगाबादच्या डी- मार्टमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. घरउपयोगी साहित्याची खरेदी झाल्यानंतर काऊंटरवर माझ्या पुढे एक मुलगा होता पैसे देण्यासाठी... त्याने त्याच्या जीन्सच्या मागच्या खिशात हात घातला आणि पर्स बाहेर काढली. तितक्यात त्याच्या खिशातून लाल- पिवळ्या रंगाचे काहीसे दुमडलेले पुडीसारखे बाहेर पडले.. माझं पटकन लक्ष गेलं आणि मी
 excuse me, तुमचं काही तरी खाली पडलंय असं म्हणाले, खाली वाकण्या अगोदरच तो मला Thanks म्हणाला..😂
मात्र त्याने पाकीट हातात घेताच, तो त्याचा मित्र, आणि
 डी-मार्टवाले दादा एकमेकांकडे बघून फार गंभीर झाले..
आणि त्याचा मित्र खूप हसायला लागला. मला वाटलंच आपण चुकीच्या जागी समाजसेवा केलीये 😊
आणि मग मी त्याच्या हातात पाहिलं... तर ते ....गाय छाप होतं..
कशी बशी पुडी खिशात घालत बिचारा बारीक तोंड करून निघून गेला.. नंतर डीमार्टवाल्या दादाने आमची उत्तम कामगिरी बघून एक पिशवी फ्री दिली..
अखिल भारतीय पिचकाऱ्या मुक्त संघटनेच्या अध्यक्षा😁