Monday 1 December 2014

कल्याणातील वाडा संस्कृती

               कल्याणातील वाडा संस्कृती
                   
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याण शहरात ५०-६० वर्षा पर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व जपत मुलांवर ,तरुणांवर सुसंस्कार घडवत वाडा संस्कृती नांदत होती.
विविध क्षेत्रात जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवलेली अनेक मंडळी या वाडा संस्कृतीतच वाढली स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ,अर्थतज्ञ भारताचार्य वैद्य ,वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी भारताबाहेर जाणाऱ्या  पहिली बारतीय महिला डॉ.आनंदी गोपाळ आदींचा उल्लेख करावा लागेल .
कल्याण शहरातील वाड्यांची  बांधणी वेगळ्या पद्धतीची असली तरी प्रत्येक वाड्यात ओसरी, मोकळी जागा ,विहीर व वाड्याभोवती भिंत असायायचीच .शिवकाळातव पेशवेकाळात या वाड्याना विशेष महत्व प्राप्त झाले होते. कल्याण शहराचा ज्या प्रमाणात विस्तार आणि विकास होत गेला त्या प्रमाणात येथल वाडे नष्ट होऊन नवीन कल्याण बसवताना विहिरी गेल्या .मोठा मोठी संकुले  तोवर उभी राहिली आणि वाद संस्कृतीऐवजी नवी ब्लोकसंस्कृती निर्माण झाली. तरीही या वाड्यांचे महत्व कमी झाले नाही त्याचां कल्याणाला आजही अभिमान आहे.

कल्याणची जडणघडणही या वाडा संस्कृतीतुनच झाली आहे.      

No comments:

Post a Comment