Thursday 4 December 2014

ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो : एक जीवनाचा प्रवास


   नुकताच whats app  वर फेसबुकवरसोशल साईटवर वर्तमानपत्रे , तसेच  tv ही  प्रत्येक  शहिदांना श्रद्धांजली म्हणून मोठमोठे msg  यावर आधारित लेख कार्यक्रम यांचा भडीमार करत होते. कारण होते ते २६/११ ह्या हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण झाली , २६-११-२००८ या वेळी घरी बसून जे काही दृश्य मी  बघत होते , त्यापेक्षा ही कल्पनेच्या पलीकडे भयंकर स्थिती प्रत्यक्षात आपले पोलिस अनुभवत होते, तसेच अहोरात्र बातम्या गोळा करून सतत प्रसारित होणाऱ्या बातम्या दाखवणारे पत्रकार या सर्वांबद्दल सहानभूती वाटत होती , मिडिया ने केलेले कवरेज ,त्या सतत येणाऱ्या बातम्या अंगावर शहारे आणत होत्या .                                                                                                                                                                                   "स्टारन्यूज  चा पत्रकार ज्याने या सर्व प्रसंगात त्यांच्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट जीवावर आलेला तो प्रसंग , त्यातही एरवी आपण पोलिसांना दोष देतो .पोलिसांवर खापर फोडून मोकळे होतो . मात्र या पुस्तकात पोलिसांच्या भावना व जीवावर बितलेल्या त्या प्रसंगावर मात करून   पत्रकाराची भूमिका ,  एक चेहरा मोहराच बदलून टाकणारी आहे. जेव्हा मी हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली तेव्हा , t. v. वर पाहिलेली सर्व दृश्य  येत होतीच माझा समोर येत होतीच. पण whats app  , facebook  वर येणारी पोस्ट फोरवर्ड करून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्यापेक्षा , ह्या पुस्तकाने मला शहिदांच्या मृत्युचे  खरे उत्तर दिले . जेव्वा t. v.  वर हे कवरेज  दाखवण्यात येत होते , तेव्हा माझ्या पण मनात अनेक प्रश्नांनी खळबळ केली होती. जर आतंकवाद्यांकडे वायरलेस फोन असतील तर त्यांना बाहेर च्या परिस्तिथीचे अंदाज समजत असणार , t. v. वर तर सगळ्याच गोष्टी दाखवल्या, . "महाकवरेज " मोठी बातमी हे सगळ दाखवून तुम्ही आपल्याच पोलिसांच्या , कमांडोच्या प्रत्येक पुढच्या पाउलची दिशा का दाखवत आहे मांत्र या धाडसी पत्रकाराने  यांच्या      ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो : एक जीवनाचा प्रवास या पुस्तकात माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली . B. M. M.  मध्ये असताना स्वत: जितेंद्र दिक्षित भावी पत्रकार विध्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. तेव्हा अनेक विध्यार्थी त्यांना २६/११ बद्दल प्रश्न विचारात होते . घरी बसून आपण पत्रकाराची निंदा करतो , पत्रकाराला समजून न घेता अनेक आरोप -प्रत्यारोप करतो . पण हाच पत्रकार जेव्हा मृत्यू च्या दारात उभा होता तेव्हा , इतक्या मोठ्या दहशतवादी हल्याबद्दल पत्रकार म्हणुन काय करावे ?? या प्रसंगाला सामोरे जाताना परत हाच माणूस जिवंत घरी पोहोचेल कि नाही ? याची कोणालाच कल्पना नव्हती.
                 या परिस्तिथी जेव्हा दहशत वादांनी सुद्धा पत्रकार जितेंद्र त्यांच्यावर हात बॉम्ब  टाकला . तेव्हा थोडक्यात बचावलेला सामान्य माणूस ही घरी गेला असता मृत्यू च्या थारोळात पडलेले लोक , सगळीकडेच दिसणारे प्रेत , या सर्व घटना गोळा करून यांचे फुटेज चैनल ला देणे आवश्यक आहे , तो जीव , मेहनत. आतांगवाद्यांवर येणारा राग , सर्वच बाजूला ठेवून , फक्त मुंबई चा ब्युरो चीफ म्हणून हा धोका पत्करून कामाला सुरुवात करणारा फक्त एक खरा पत्रकारच असू शकतो .                                                                                                       ह्या पुस्तकात पत्रकार म्हणून अनेक आयुक्त , अधिकारी  , A T S  प्रमुख ह्या सर्वांबद्दल आदर ओळख असताना त्यांच्या एकावर एक मृत्युच्या बातम्या येत असताना , जो पत्रकार पुढच्या क्षणाला समोर मृत्यू पाहतोय , तरी हि स्वतः ला सावरून तो त्याच्या कामासाठी  एकनिष्ट आहे . हे मी अनुभवत होते . २६/११ च्या निमित्ताने मुंबईत जागोजागी शहिदांचे फोटो , आदरांजली  वाहण्यात आली . अर्थातच आदर हवा . मनात हि भावना हवीच ज्यांनी स्वतच्या प्राणाची आहुती दिली . त्या पोलिसांना आदरासोबत आपल्या सारख्या तरुण मुलांच्या पाठिंब्याची गरज हि आहे . संशयी वस्तूंना हात लावू नका ? काही संशयी वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा . मात्र आपल्यापैकी किती लोक ह्या सुचनांबद्दल जागृत आहे याचा विचार करा ? स्टेशन वर शहिदांचे फोटो पहिले , जिथे आतंगवाद्याकडे  AK४७ होती तेव्हा आपल्या पोलिसांकडे साध्या बंदुका , जिथे साध्या ENCOUNTER मध्ये ४ ते ५ गोळ्या झाडून पोलीस  आरोपीचा खात्मा करतात . तेव्हा हेच आतंकवादी एके४७ मधून एका मिनिटात ६०० राउंड झाडण्याची क्षमता असलेल्या बंदुकांचा वापर करत. आपल्या पोलिसांकडे बुलेट प्रूफ जाकेट नसतात हि, यांनी प्राणांची बाजी लावली होती मात्र फक्त  आपण आदरांजली वाहून आपले कर्तव्य पूर्ण करणार का ?भूक -तहान विसरून पोलिसांप्रमाणे हल्ल्याच्या कवरेजसाठी प्रयत्न करणाऱ्या या पत्रकाराला करू जितके धन्यवाद कमी आहे . 
                     या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर फक्त एक कथा म्हणून नाही, तर या पत्रकाराच्या नशिबी आलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पडू शकते ना ! जर डोळ्यासमोर प्रेतच प्रेत असताना मानसिक स्थिती संपूर्ण पणे कोलमडलेली असताना या क्षेत्रात असणारी आव्हाह्ने मी पेलू शकते ना? या विचाराने मला भांबावून सोडले. चुका ह्या सगळ्याकडूनच होतात मिडियावाले कधी कधी समोरच्या माणसाची परिस्थिति लक्षात न घेता ? सुरु होतात . मात्र आपण सामान्य नागरिक म्हणून हि या सर्व गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्वाचे.. जिथे आपल्या साहसी , शौर्यवान पोलिसांनी रात्रीचा - दिवस करून ह्या दहशतवादाचा खात्मा करून एका जिवंत आतंकवादी ला पकडले . तेव्हाच हा कसाब आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी चांगला  वागत नव्हता. शिवीगाळ करत होता , तर त्याच्यावर  आपले सरकार करोडो रुपयांची उधळण करत होती .     द बुलेट प्रूफ जेकेट  असो नाहीतर जितेंद्र दीक्षित चा  ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो : एक जीवनाचा प्रवास, श्रान्धांजली देणे , सहानभूती वाटणे , सगळे यांच्या त्या त्या जागी ठीक आहे , मात्र गरज आहे बदलण्याची सतत मिडिया वाले , पोलीस यांच्यावर खापर न फोडता..  या यंत्रणेत काही बदल करता येईल का ? याचा विचार जरूर करा ,। आणी तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर पोहोचवू द्या ……. 
                     धन्यवाद 


No comments:

Post a Comment