Saturday 6 December 2014

जीवन होऊ शकते सोपे…



                  आयुष्यातील गेलेला क्षण कोट्यावधी सुवर्णानी परत मिळत नाही. पैशाला जीवापाड जपलं जातं,तसा आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला दिवसातील प्रत्येक क्षणाला … जपलं पाहिजे कारणी लावला पाहिजे अनुभवांनी त्याचं सोनं केला पाहिजे. या जीवनात सारं घामानं आणि श्रमांनच मिळवायचं असतं, प्रामाणिक प्रयत्न हेच जीवनाचा बलस्थान असतं. प्रत्येकाचा जीवनात अडचणी येतात. चिंता दुख तर प्रत्येकाला सदैव धरून असतं. पण मनात जिद्द आणि जीवापाड कष्ट केले तर स्वप्न साकार होणं अवघड नाही.                                                                                                                                                                                आपल्याला मिळालेला जीवन हि कसदार जमीन आहे, तिची छाननी मशागत करून, निगराणी करून सुखात आपण जगायचा कि निष्काळजी राहून जीवनात खूप दुख आहे असा सांगत फिरत सुंदर जीवन वाळवांट बनवायचा हे ज्याने त्यानेच ठरवाव. खुपदा आपण एकतो, लोक आत्महत्या करतात कारण काहीही असो, पण आपल्यला वाटत असतं तसा जीवन कधीच नसतं, अखंडपणे करीत राहण्याची तडजोड असते. कोणासाठी तरी स्वताला मोल्ड करणे, गरजेचे असतेच. काळकाळ तर सतत पुढे जात असतो . सुख मिळवण्यासाठी काळा सोबत धावण्यात झगडण्यात जीवन संपून जाते आयुष्यभर मानहानीचे प्रसंग कुरतहत असतात. निमूट माधर घ्यावी लागल्याने पड खाल्याचे क्षण सतावत असतात शिवाय त्यावेळी मी असं का बोलले नाही? गप्प का राहिले? म्हणून आपण स्वतः चाच छळ करीत असतो. हे सार सोडता यायला हवा स्वताच्या सुखासाठी।                                                                                                                आपल्याला जे मिळत आहे ते आनंदाने स्वीकारून जीवन सुखाचे करणे आत्ता गरजेचे आहे. पण असा न होता उलट आपण माझंच नशीब असा का? नियती वर दोष देत खंत करीत बसतो . अशा रीतीने स्वतः शीच उभा दावा मांडून आपला वर्तमान आपणच नासवून टाकत असतो. खरं तर आयुष्यत आपल्याला किती तरी गोष्टी मिळालेल्या असतात काय काय मिळालं आणि काय नाही मिळालं याची यादी केली तर मिळालेल्या गोष्टी ध्यानात येत नाही आणि एखादी मिळाली नाही म्हणून हळहळण्यात सगळा जन्म वाया जातो. अविरत काम करणारे हे दोन हात, अखंड चालणारे दोन पाय, मन, बुद्धी काय करतात हे आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारला तर समाधानकारक उत्तर मिळतंय का ? हे बघाव कारण अजून हि वेळ गेलेली नाही अजून सुरवात करू या. आपल्या शिक्षणाचा, वयाचा, अनुभवाचा इतरांना कसा उपयोग होईल, हेच पाहायला हवं. आणि अशा रीतीने अखंडपणे जगत गेल्यास आपल्या एका एका कामाची फुलं बनून जीवन हि एका आनंदाकडे दुसऱ्या आनंदाकडे जाणारी आनंदयात्रा बनते. एकचं आयुष्य आपल्या वाटेला आलेला असता त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा. आत्ता माझं वय झालं असं म्हणुन सोडून देऊ नये… नातवंकडे बघून काही तरी नानीन शिकू असे बोलून आपला वय विसरायला लावण्याची जबरदस्त ताकद आहे त्यात……                                                                                                                                                                                                                                                                             आयुष्यरुपी हिरा प्रत्येकाला मिळालेला असतो, पण त्याला पैलू पाडण्याचे काम ज्याला त्यालाच करावे लागते.

1 comment:

  1. खुप छान लिहीता तुम्ही👌👌👍

    ReplyDelete