Friday 5 December 2014

भूमिका बदला … सग़ळ काही बदलेल

भूमिका बदला … सग़ळ काही बदलेल                                                                                                                                                                                                                                                                                                                   वृतपत्रांना समाजाचा आरसा मानला जात, कारण खऱ्या बातम्या वास्तवदर्शी जीवन मांडण्याचा वृतपत्रे सतत प्रत्यत्न करत असतात, पहिल्या पानावर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या बातम्या देण्यात याव्या. असे नियम मात्र आत्ता पाळले जात नाही,आणि गेल्या काही वर्षात तर वृतापत्रांच्या व्याख्येत पूर्णपणे बदल झाल्याचे चित्र दिसत आहे.. खून, हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा भयानक बातम्यांनीच पहिले पान रंगवून भरले जाते. आता या डिसेंबर महिन्यात तर महिलांवरील अत्याचाराचा,छेडछाडीच्या मोठ्या प्रमाणावर बातम्या समोर येतील आणि पेपरच्या पहिल्या पानावर या लाजिरवाण्या घटना छापण्यात येतील आणि हे पहिले पान भरलेले दिसेल,                                                                                                                 या मतीसुन्न करणाऱ्या बातम्या पाहून मनात येते कि लोकांना झाले तरी काय? जनावरांना देखील भावना असतात,मग माणुसकीला लाज वाटेल असे कृत्य लोक करतात  तरी कसे?  पण मुंबईत, महाराष्ट्र तसेच देशात हि मुलींवर  अत्याचाराचा  बातम्यायेणे काही थांबत नाही,भारताच्या राजधानीत चालू बसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कारची घटना झाली, माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना… या घटनेच्या विरोधात अनेक तरुण तरुणी या वेळी रस्त्यावर उतरून तोंडावर काळी पट्टी बांधून, सरकार विरोधात, घोषणा करत होते… पण खरचं असा करून मेणबत्या लावून, मोर्चा कडून आपण न्याय मिळवू शकतो का? पूर्वीच्या काळी जनजागृतीसाठी  " आता उठवू सारे रान, आत्ता पेटवू सारे रान" म्हणुन प्रभात फेऱ्या काढल्या जात, पण आत्ता देशात कुठे हि काही झाले, तर लोक रस्त्यावर उतरतात. आणि मग काही ठिकाणी हिंसक वळण लागले जाते या विषयावर बोलण्यचे कारण इतकेच वर्ष अखेरला वर्षभरात झालेल्या वाईट गोष्टींची घटनांची उजळणी केली जाते. माध्यमांना हि या निमिताने " उत्तम स्टोरी "करण्यासाठी विषय मिळतो. पण खरच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबर, महिलांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे. आरोपीला फाशी द्या,हि मागणी पुढे आलीपण फाशी देऊन अशा घटना थांबणार आहेत का?                                                                                                                  फक्त राजकीय नेत्यांची भडकाऊ भाषणे ऐकुण, बातम्या पाहून. वृतापत्राच्या पहिल्या पानावर फोटो, स्त्री अत्यचाराचा प्रश्न सुटणार नाही, समाजात लोकांची मानसिकता बदलून जशी आपल्या घरातील आई, बहिण ज्यांचा  आपण आदर करतो, असा बाहेर हि करणे गरजेचे अहे… शिवाजी महाराजांनी सागितल्या प्रमाणे परस्त्री माते प्रमाणे. जर सगळ्यानी असाच विचार केला. तर अशा बातम्या येणार हि नाही आणि मुंबई काय पण पूर्ण भारतात कुठयेच मुलीना. स्त्रीयांना असुरक्षित वाटणार नाही…

No comments:

Post a Comment