Wednesday 3 December 2014

शुभ मंगल <सावधान>

सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहे. कुठे हॉल बुकिंग तर कुठे शॉपिंग, ब्राह्मणाकडून मुहूर्त काढणे, शिवाय लग्न पत्रिका आलीच. याचबरोबर वेगवेगळ्या जातींच्या वधू वर मेळlव्याचे आयोजन ही मोठ्या धामधूंम रीतीने होताना दिसते. tv वर पण shadi.com सारख्या साइट्सची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. याच लग्न सराई मध्ये माझ्या जवळच्या एका ताईला मुलगा बघायला सुरूवात केली,अशी बातमी कानावर आली आमच्यात वयाने जास्त अंतर नसल्याने व आम्ही खूप छान frnds असल्याने, मी विचारले. मग कसा हवा मुलगा? अपेक्षा काय तुझ्या?  Hmm !!!  पण आई बाबा सांगतात तेच करावा लागता ना आपल्यात.. लोक काय बोलतात हेच महत्वाचा असता. तिच्या बोलण्यात राग होता मला वाटल की तिला अजुन तरी लग्न करायचा नाहीय पण प्रोब्लम हा नव्हता. या ताई चे शिक्षण कंप्यूटर इंजिनियरिंग दिसायला ही सुंदर..सर्वकाही छान पण तिला राग होता तो या वधूवर सूचक मंडळाचा..                                                                           अजुन ही आपल्या समाजात  जातीतल्या जातीत लग्न करायला प्राधान्य दिले जाते. या अरेंज मॅरेज मध्ये बधायला आलेला मुलगा सभ्य म्हणून समोर येणारच.  त्याला जर दारू सिगरेटचे व्यसन असले तरी मुलगी बघायला जाताना हा सभ्यतेचा आव आणनारच तो दारू पित त्याच्या खऱ्या रंगात समोर कधी येणारच नाही.. मग अशावेळी का विश्वास ठेवावा या वधू वर मंडळात, तिच्या बोलण्यातून साफ जाणवत होते तिला राग या अरेंज मंरेज चा नाहीये?

 तर या पद्धतीचा आहे वधू वर मंडळात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या पण असतील. मात्र आपल्या समाजातील रूढी, परंपरा, दृष्टीकोन, अजून जुन्याच आहेत .काळासोबत बदलून, मुलामुलींच्या शारीरिक चाचण्या, रक्तगट तपासणे पूर्वी कोणता आजार तर नाही ना! अशी विचारपूस करून तसेच दोघांचे विचार एकमेकांशी किती जुळतात याचा विचार करणे आज समाजाची गरज आहे. आज हि पत्रिका जुळत नाही ,म्हणून लग्नाला नकार देणारे हजारो आहेत. मग ह्या  मॉर्डन समाजात status जपणाऱ्या या लोकांना ह्या जुनाट गोष्टीवर विश्वास कसा ? पूर्वीच्या काळी मुलीला शिवण कामजेवण उत्तम सुगरण, गाणी गाता, आली तर उत्तमच. असे प्रश्न विचारले जायचेया पेक्षा पण over तर आजी सांगायची चालून दाखव, बोलून दाखव ग पोरी! असले प्रकार पण होत असे. हा झाला गंमती चा भाग.. तेव्हा होत पण असेल अस। मात्र या ताईला वधुवर मंडळात भेटलेल्या एका मुलाने तर कहरच केला direct तुझी माहिती मेल कर असे सांगितले प्रत्यक्षात समोर बोलण्यापेक्षा यांना मेल वर बोलणे अधिक सोयीस्कर वाटते. त्यात हि मेलवर या मुलीच्या स्वभावाबद्दल, आवडीनिवडी , होणाऱ्या नवऱ्या काढूनच्या अपेक्षा यात त्याला जर हि interest नव्हतामुलाने पहिला प्रश्न विचारला? तू सध्या किती कामावतेस? . भविष्यात job  plan काय? हा मुलगा महिना दीड लाख कमावतो. कंपनी कडून घर ,गाडी सर्व सोयी तरी पण याला पैसा कमावणारी मशीन हवी  होती.  ती ने त्याला reply दिला job करायचा तर आहेच पण  job बद्दल मोठी अशी अपेक्षा नाही. आधी घर घरातले.. या मुलाने वधू वर मेळ्याव्यात सांगितलेल्या अपेक्षा ह्या तर वेगळ्या होत्याच.आणि एका मुलीशी बोलत असताना तो एका business meeting ला करावी अशी डील करत होता. असे. लग्न टिकू शकेल.?                                                                                                                                                                                                                                             वधू वर मंडळातून होणारी सगळीच लग्न फसवी असतात असा नाही. पण समाजात आपण अरेंज मंरेज केल्याचे समाधान व्यक्त करतो खरे पण कधी एखाद्या नात्याचा पायाच नसला तर घर होणार कसा? आणि मग आपण दोष तरी कोणाला देणार. नंतर mail च्या भरोसे लग्न ठरवणाऱ्या  या मुलाला त्याचा नकार सुद्धा mail करून  देता आला नाही, फक्त love marriage  करून लग्न तुटतात, समाजात नाव खराब होता, घरची इज्जत जाते, असा नाहीय  समाजाच्या साक्षीने होणारी लग्न पण तुटतात. त्यत घोर फसवणूक होऊन लग्न आधी असणारे रोग आजार लपवणारे पण अनेक आहेत मग जीवनभरचा साथीदार अशा वधू वर मंडळात, social साईट वर जाऊन मिळालाच तरी तो आयुष्यभर साथ देईल का? पैसा, job profile कमी जास्त होईल तसा हा बदलेल एका नव्या नात्याची सुरवात अशी लोक वाईट आठवणी देऊन करणार असतील तर पुढे काय होईल हे कोणती पत्रिका जोतिष नाही सांगू शकत……।  

3 comments: