लहानपणी खेळता खेळता कधी मोठे होतो ते समजत नाही, लहानपणी
फक्त एकच काम खाणे, खेळणे, मज्जा मस्ती आपण कधी विचार तरी करतो का कि
जन्मापासूनच आपला हा प्रवास सुरु होतो. बालपणात आधी बालवाडी कडे प्रवास मग ती अंगणवाडी… आपल्या
सोबत आई बाबा ची पण शाळा सुरु होते…. रोजचे क, ख, ग, रोजची
अ, आ, इ, खेळता
बागडता बालपण कधी सरले हे काही कळलेच नाही……. वाढता
वाढता पुस्तकांचे ओझे पाठीवर आले आत्ता प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये आलो. बाई
गेल्या आणि मॅङम आल्या शाळा क्लास यामुळे हि मुला किती busy झाली
हे आपण आजूबाजूला बघतोच। त्यात येते दहावी मग बारावी म्हणजे आत्ता पुढचा प्रवास
सुरु होतो पहिली ते दहावी नंतर बारावी पाठीवरचे ओझे काही कमी होत नाही वाढता वाढता
शाळा झाली हे काही कळलेच नाही। शिकता शिकता येते मग तारुण्या.. तारुण्यात आल्यावर प्रेमात पडतो, यावेळी मनात नुसता गोंधळ उठला असतो पाय ठेवायला दहा दगड असतात. कोणी बोलत, डॉक्टर हो तर कोणी बोलत वकील, अशा परिस्थितीतून जाऊन एकदाचा कॉलेज पूर्ण होऊन आपण
तारुण्यात असता असता पुढच्या प्रवासकडे वाटचाल करतो. तारुण्य हरवून जाते आणि पाहता
पाहता लग्नाच्या गाठीत आपण अडकतो. जो प्रवास आज पर्यंत एकट्याने केला असतो त्यात
आत्ता सोबत एक सोबती असतो. भरपूर काम आशा आकांक्षा या सर्व विचारांनी थोडे बसू आणि
बोलू या साठी पण वेळ नसतो आजच्या या
धकाधकीच्या जगात नुसता धावताना दिसतात लोक. जीवन तरी
आपले असले तरी त्यात आपली लोक आपली नाती यासाठी घर परिवार मुलांचा विचार एक नवी
जवाबदारी आलेली असते.. या लग्न नंतर मुलांची शाळाआपली स्वप्न बाजूला राहून मुलांच्या भविष्याचा विचार सतत असतो. स्पर्धेच्या या युगात आत्ता आपण कुटुंबांसोबत धावत असतो. रोजच्या हजार जबाबदाऱ्या पूर्ण करून माणूस पुढे जात असतोच. आत्ता नव्या लग्नाचे गुलाबी दिवस जाऊन म्हातारपण आलेले
असते. लोक अनेक वेळा बोलतात मुला मोठी कशी झाली समजलाच नाही. कारण प्रवासात सतत
पुढची वाटचाल पाहताना मागे बघायचे राहूनच जाते. उद्याची काळजी आजची आजच करत
असल्याने डोक्यावरचे केस कधी पांढरे होतात हे काही कळत नाही, बोलता बोलता म्हातारपण कधी आले हे मात्र समजत नाही.
धावणारे पाय आत्ता लगेच थकून जातात. चेहऱ्या वरचे तेज आत्ता हळू हळू कम झाले असते.
बोलका स्वभाव आत्ता चिडचिडा झालेला असतो. ज्या मुलांसाठी संपूर्ण आयु्ष्य वेचला असताना
आत्ता तीच मुला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात तरी सुद्धा जीवनाचा प्रवास हा
संपला नसतो कारण हसता हसता रडायला कधी लागलो हे मात्र आत्ता समजतच नाही.. आत्ता वेळ
आली असते ती प्रवास संपवून एका दुसऱ्या जगात जाण्याची आणि जगता जगता मरण कधी येते
ते हि कधी कळत नाही….
Friday, 5 December 2014
भूमिका बदला … सग़ळ काही बदलेल
भूमिका बदला … सग़ळ काही बदलेल वृतपत्रांना समाजाचा आरसा मानला जात, कारण खऱ्या बातम्या वास्तवदर्शी जीवन मांडण्याचा वृतपत्रे सतत प्रत्यत्न करत असतात, पहिल्या पानावर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या बातम्या देण्यात याव्या. असे नियम मात्र आत्ता पाळले जात नाही,आणि गेल्या काही वर्षात तर वृतापत्रांच्या व्याख्येत पूर्णपणे बदल झाल्याचे चित्र दिसत आहे.. खून, हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा भयानक बातम्यांनीच पहिले पान रंगवून भरले जाते. आता या डिसेंबर महिन्यात तर महिलांवरील अत्याचाराचा,छेडछाडीच्या मोठ्या प्रमाणावर बातम्या समोर येतील आणि पेपरच्या पहिल्या पानावर या लाजिरवाण्या घटना छापण्यात येतील आणि हे पहिले पान भरलेले दिसेल, या मतीसुन्न करणाऱ्या बातम्या पाहून मनात येते कि लोकांना झाले तरी काय? जनावरांना देखील भावना असतात,मग माणुसकीला लाज वाटेल असे कृत्य लोक करतात तरी कसे? पण मुंबईत, महाराष्ट्र तसेच देशात हि मुलींवर अत्याचाराचा बातम्यायेणे काही थांबत नाही,भारताच्या राजधानीत चालू बसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कारची घटना झाली, माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना… या घटनेच्या विरोधात अनेक तरुण तरुणी या वेळी रस्त्यावर उतरून तोंडावर काळी पट्टी बांधून, सरकार विरोधात, घोषणा करत होते… पण खरचं असा करून मेणबत्या लावून, मोर्चा कडून आपण न्याय मिळवू शकतो का? पूर्वीच्या काळी जनजागृतीसाठी " आता उठवू सारे रान, आत्ता पेटवू सारे रान" म्हणुन प्रभात फेऱ्या काढल्या जात, पण आत्ता देशात कुठे हि काही झाले, तर लोक रस्त्यावर उतरतात. आणि मग काही ठिकाणी हिंसक वळण लागले जाते या विषयावर बोलण्यचे कारण इतकेच वर्ष अखेरला वर्षभरात झालेल्या वाईट गोष्टींची घटनांची उजळणी केली जाते. माध्यमांना हि या निमिताने " उत्तम स्टोरी "करण्यासाठी विषय मिळतो. पण खरच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबर, महिलांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे. आरोपीला फाशी द्या,हि मागणी पुढे आलीपण फाशी देऊन अशा घटना थांबणार आहेत का? फक्त राजकीय नेत्यांची भडकाऊ भाषणे ऐकुण, बातम्या पाहून. वृतापत्राच्या पहिल्या पानावर फोटो, स्त्री अत्यचाराचा प्रश्न सुटणार नाही, समाजात लोकांची मानसिकता बदलून जशी आपल्या घरातील आई, बहिण ज्यांचा आपण आदर करतो, असा बाहेर हि करणे गरजेचे अहे… शिवाजी महाराजांनी सागितल्या प्रमाणे परस्त्री माते प्रमाणे. जर सगळ्यानी असाच विचार केला. तर अशा बातम्या येणार हि नाही आणि मुंबई काय पण पूर्ण भारतात कुठयेच मुलीना. स्त्रीयांना असुरक्षित वाटणार नाही…
Thursday, 4 December 2014
ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो : एक जीवनाचा प्रवास
नुकताच whats app वर फेसबुकवर, सोशल साईटवर
वर्तमानपत्रे , तसेच tv ही प्रत्येक शहिदांना श्रद्धांजली म्हणून मोठमोठे msg यावर आधारित लेख कार्यक्रम यांचा भडीमार करत होते. कारण होते ते २६/११ ह्या हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण झाली , २६-११-२००८ या
वेळी घरी बसून जे काही दृश्य मी बघत होते , त्यापेक्षा ही कल्पनेच्या
पलीकडे भयंकर स्थिती प्रत्यक्षात आपले पोलिस अनुभवत
होते, तसेच अहोरात्र बातम्या गोळा करून सतत प्रसारित होणाऱ्या बातम्या
दाखवणारे पत्रकार या सर्वांबद्दल सहानभूती वाटत होती , मिडिया ने केलेले
कवरेज ,त्या सतत
येणाऱ्या बातम्या अंगावर शहारे आणत होत्या . "स्टारन्यूज चा
पत्रकार ज्याने या सर्व प्रसंगात त्यांच्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट जीवावर
आलेला तो प्रसंग , त्यातही एरवी आपण पोलिसांना दोष देतो .पोलिसांवर खापर फोडून
मोकळे होतो . मात्र या पुस्तकात पोलिसांच्या भावना व जीवावर बितलेल्या त्या
प्रसंगावर मात करून पत्रकाराची भूमिका , एक चेहरा मोहराच बदलून टाकणारी आहे. जेव्हा मी हे
पुस्तक वाचण्यास सुरुवात केली तेव्हा , t. v. वर पाहिलेली सर्व दृश्य येत होतीच माझा समोर येत
होतीच. पण whats app , facebook वर येणारी पोस्ट फोरवर्ड करून आपण भावपूर्ण
श्रद्धांजली देण्यापेक्षा , ह्या पुस्तकाने मला शहिदांच्या मृत्युचे खरे उत्तर दिले .
जेव्वा t. v. वर हे कवरेज दाखवण्यात येत होते , तेव्हा माझ्या पण
मनात अनेक प्रश्नांनी खळबळ
केली होती. जर आतंकवाद्यांकडे वायरलेस फोन असतील तर त्यांना बाहेर
च्या परिस्तिथीचे अंदाज समजत असणार , t. v. वर तर सगळ्याच गोष्टी दाखवल्या, . "महाकवरेज " मोठी बातमी हे सगळ दाखवून तुम्ही
आपल्याच पोलिसांच्या , कमांडोच्या प्रत्येक पुढच्या पाउलची दिशा का दाखवत आहे ? मांत्र या धाडसी
पत्रकाराने यांच्या ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो : एक जीवनाचा
प्रवास या पुस्तकात माझ्या सगळ्या प्रश्नांची
उत्तरे दिली . B. M. M. मध्ये असताना स्वत: जितेंद्र दिक्षित
भावी पत्रकार विध्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. तेव्हा अनेक विध्यार्थी त्यांना २६/११ बद्दल प्रश्न विचारात
होते . घरी बसून आपण पत्रकाराची निंदा करतो , पत्रकाराला समजून न घेता अनेक आरोप -प्रत्यारोप करतो . पण
हाच पत्रकार जेव्हा मृत्यू
च्या दारात उभा होता तेव्हा , इतक्या मोठ्या दहशतवादी हल्याबद्दल पत्रकार म्हणुन काय करावे
?? या प्रसंगाला
सामोरे जाताना परत हाच माणूस जिवंत घरी पोहोचेल कि नाही ? याची कोणालाच
कल्पना नव्हती.
या परिस्तिथी जेव्हा दहशत वादांनी सुद्धा
पत्रकार जितेंद्र त्यांच्यावर हात बॉम्ब टाकला . तेव्हा थोडक्यात
बचावलेला सामान्य माणूस ही घरी गेला असता मृत्यू च्या थारोळात पडलेले लोक , सगळीकडेच दिसणारे
प्रेत , या सर्व घटना
गोळा करून यांचे फुटेज चैनल ला देणे आवश्यक आहे , तो जीव , मेहनत. आतांगवाद्यांवर येणारा
राग , सर्वच बाजूला
ठेवून , फक्त मुंबई चा
ब्युरो चीफ म्हणून हा धोका पत्करून कामाला सुरुवात करणारा फक्त एक खरा पत्रकारच असू शकतो . ह्या पुस्तकात पत्रकार म्हणून अनेक आयुक्त , अधिकारी , A T S प्रमुख ह्या
सर्वांबद्दल आदर ओळख असताना त्यांच्या एकावर एक मृत्युच्या बातम्या येत असताना , जो पत्रकार
पुढच्या क्षणाला समोर मृत्यू पाहतोय , तरी हि स्वतः ला सावरून तो त्याच्या कामासाठी एकनिष्ट
आहे . हे मी अनुभवत होते . २६/११ च्या निमित्ताने मुंबईत जागोजागी शहिदांचे
फोटो , आदरांजली
वाहण्यात आली . अर्थातच आदर हवा . मनात हि भावना हवीच ज्यांनी स्वतच्या
प्राणाची आहुती दिली . त्या पोलिसांना आदरासोबत आपल्या सारख्या तरुण मुलांच्या
पाठिंब्याची गरज हि आहे . संशयी वस्तूंना हात लावू नका ? काही संशयी वस्तू
आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा . मात्र आपल्यापैकी किती लोक ह्या सुचनांबद्दल जागृत आहे याचा विचार करा ? स्टेशन वर
शहिदांचे फोटो पहिले , जिथे आतंगवाद्याकडे AK४७ होती तेव्हा
आपल्या पोलिसांकडे साध्या बंदुका , जिथे साध्या ENCOUNTER मध्ये ४ ते ५ गोळ्या झाडून पोलीस आरोपीचा खात्मा
करतात . तेव्हा हेच आतंकवादी एके४७ मधून एका मिनिटात ६०० राउंड झाडण्याची क्षमता
असलेल्या बंदुकांचा वापर करत. आपल्या पोलिसांकडे बुलेट प्रूफ जाकेट नसतात हि, यांनी प्राणांची
बाजी लावली होती मात्र फक्त आपण आदरांजली वाहून आपले कर्तव्य पूर्ण
करणार का ?भूक -तहान विसरून पोलिसांप्रमाणे हल्ल्याच्या कवरेजसाठी प्रयत्न
करणाऱ्या या पत्रकाराला करू जितके धन्यवाद कमी आहे .
या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर फक्त एक कथा म्हणून
नाही, तर या
पत्रकाराच्या नशिबी आलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पडू शकते ना ! जर डोळ्यासमोर प्रेतच
प्रेत असताना मानसिक स्थिती संपूर्ण पणे कोलमडलेली असताना या क्षेत्रात असणारी आव्हाह्ने मी
पेलू शकते ना? या विचाराने मला भांबावून
सोडले. चुका ह्या सगळ्याकडूनच होतात मिडियावाले कधी कधी समोरच्या माणसाची
परिस्थिति लक्षात न घेता ? सुरु होतात . मात्र आपण सामान्य नागरिक म्हणून हि या सर्व
गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्वाचे.. जिथे आपल्या
साहसी , शौर्यवान
पोलिसांनी रात्रीचा - दिवस करून ह्या दहशतवादाचा खात्मा करून एका जिवंत आतंकवादी
ला पकडले . तेव्हाच हा कसाब आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी चांगला वागत नव्हता. शिवीगाळ करत
होता , तर त्याच्यावर आपले सरकार करोडो
रुपयांची उधळण करत होती . द बुलेट प्रूफ
जेकेट असो नाहीतर जितेंद्र दीक्षित चा ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो : एक जीवनाचा
प्रवास, श्रान्धांजली देणे , सहानभूती वाटणे , सगळे यांच्या त्या त्या जागी
ठीक आहे , मात्र गरज आहे
बदलण्याची सतत मिडिया वाले , पोलीस यांच्यावर खापर न फोडता.. या यंत्रणेत काही
बदल करता येईल का ? याचा विचार जरूर करा ,। आणी तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर पोहोचवू द्या …….
धन्यवाद
Wednesday, 3 December 2014
शुभ मंगल <सावधान>
सध्या सर्वत्र
लग्नाचे वारे वाहत आहे. कुठे हॉल बुकिंग तर कुठे शॉपिंग, ब्राह्मणाकडून मुहूर्त काढणे, शिवाय लग्न पत्रिका आलीच. याचबरोबर वेगवेगळ्या जातींच्या
वधू वर मेळlव्याचे आयोजन ही मोठ्या
धामधूंम रीतीने होताना दिसते. tv वर पण shadi.com सारख्या साइट्सची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणावर
होताना दिसते. याच लग्न सराई मध्ये माझ्या जवळच्या एका ताईला मुलगा बघायला सुरूवात
केली,अशी बातमी कानावर आली आमच्यात वयाने
जास्त अंतर नसल्याने व आम्ही खूप छान frnds असल्याने, मी विचारले. मग कसा हवा मुलगा?
अपेक्षा काय तुझ्या? Hmm !!!
पण आई बाबा सांगतात तेच
करावा लागता ना आपल्यात.. लोक काय बोलतात हेच महत्वाचा असता. तिच्या बोलण्यात राग
होता मला वाटल की तिला अजुन तरी लग्न करायचा नाहीय पण प्रोब्लम हा नव्हता. या ताई
चे शिक्षण कंप्यूटर इंजिनियरिंग दिसायला ही सुंदर..सर्वकाही छान पण तिला राग होता
तो या वधूवर सूचक मंडळाचा.. अजुन ही आपल्या समाजात जातीतल्या जातीत लग्न करायला प्राधान्य दिले जाते. या अरेंज मॅरेज
मध्ये बधायला आलेला मुलगा सभ्य म्हणून समोर येणारच. त्याला जर दारू सिगरेटचे व्यसन असले तरी मुलगी
बघायला जाताना हा सभ्यतेचा आव आणनारच तो दारू पित त्याच्या खऱ्या रंगात समोर कधी
येणारच नाही.. मग अशावेळी का विश्वास ठेवावा या वधू वर मंडळात, तिच्या बोलण्यातून साफ जाणवत होते तिला राग या अरेंज मंरेज चा नाहीये?
तर या पद्धतीचा आहे वधू वर मंडळात हल्ली बऱ्याच
सुधारणा झाल्या पण असतील. मात्र आपल्या समाजातील रूढी, परंपरा, दृष्टीकोन, अजून जुन्याच
आहेत .काळासोबत बदलून, मुलामुलींच्या शारीरिक चाचण्या,
रक्तगट तपासणे पूर्वी
कोणता आजार तर नाही ना! अशी विचारपूस करून तसेच दोघांचे विचार एकमेकांशी किती
जुळतात याचा विचार करणे आज समाजाची गरज आहे. आज हि पत्रिका जुळत नाही ,म्हणून लग्नाला नकार देणारे हजारो आहेत. मग
ह्या मॉर्डन समाजात status जपणाऱ्या या लोकांना ह्या जुनाट गोष्टीवर
विश्वास कसा ? पूर्वीच्या काळी मुलीला
शिवण काम, जेवण उत्तम सुगरण, गाणी गाता, आली तर उत्तमच.
असे प्रश्न विचारले जायचे… या पेक्षा पण over तर आजी सांगायची चालून दाखव, बोलून दाखव ग पोरी! असले प्रकार पण होत असे. हा झाला गंमती चा भाग.. तेव्हा होत पण असेल अस। मात्र या ताईला वधुवर
मंडळात भेटलेल्या एका मुलाने तर कहरच केला direct तुझी माहिती मेल कर असे सांगितले प्रत्यक्षात समोर बोलण्यापेक्षा यांना मेल वर बोलणे अधिक
सोयीस्कर वाटते. त्यात हि मेलवर या मुलीच्या स्वभावाबद्दल, आवडीनिवडी , होणाऱ्या नवऱ्या
काढूनच्या अपेक्षा यात त्याला जर हि interest नव्हता, मुलाने पहिला प्रश्न विचारला? तू सध्या किती कामावतेस? . भविष्यात job plan काय? हा मुलगा महिना दीड लाख कमावतो. कंपनी कडून घर ,गाडी सर्व सोयी तरी पण
याला पैसा कमावणारी मशीन हवी होती.
ती ने त्याला reply दिला job करायचा तर आहेच
पण job बद्दल मोठी अशी
अपेक्षा नाही. आधी घर घरातले.. या मुलाने वधू वर मेळ्याव्यात सांगितलेल्या
अपेक्षा ह्या तर वेगळ्या होत्याच.आणि एका मुलीशी बोलत असताना तो एका business meeting ला करावी अशी डील करत होता. असे. लग्न टिकू शकेल.? वधू वर मंडळातून होणारी
सगळीच लग्न फसवी असतात असा नाही. पण समाजात आपण अरेंज मंरेज केल्याचे समाधान
व्यक्त करतो खरे पण कधी एखाद्या नात्याचा पायाच नसला तर घर होणार कसा? आणि मग आपण दोष तरी कोणाला देणार. नंतर mail च्या भरोसे लग्न
ठरवणाऱ्या या मुलाला त्याचा नकार सुद्धा mail करून देता आला नाही, फक्त love marriage करून लग्न तुटतात, समाजात नाव खराब होता, घरची इज्जत जाते, असा नाहीय समाजाच्या साक्षीने होणारी
लग्न पण तुटतात. त्यत घोर फसवणूक होऊन लग्न आधी असणारे रोग आजार लपवणारे पण अनेक
आहेत मग जीवनभरचा साथीदार अशा वधू वर मंडळात, social साईट वर जाऊन
मिळालाच तरी तो आयुष्यभर साथ देईल का? पैसा, job profile कमी जास्त होईल तसा हा बदलेल एका नव्या नात्याची सुरवात अशी
लोक वाईट आठवणी देऊन करणार असतील तर पुढे काय होईल हे कोणती पत्रिका जोतिष नाही
सांगू शकत……।
Monday, 1 December 2014
ऐतिहासिक स्थळे : पावित्र्य जपण्याची गरज
आपल्या महाराष्टाची ओळख गड
किल्ले,ऐतिहासिक स्थळ इतिहासातल्या त्या पराक्रमी,शोर्यागाथाची ओळख करून
देतात. शाळेत असताना सुध्दा शिवकालीन किल्याची माहिती
व्हांवी म्हणून शाळेची ट्रीप अशाच ऐतिहासिक स्थळावर जात असे. आपल्यापैकी किती जण
या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या भव्य अशा किल्लाची व वास्तूची व्यवस्थित पाहणी
करतात. आपल्या संस्कुतीचे दर्शन यातून मिळत असते. वेगवेगळ्या कला, चित्र, राजा
महाराजांच्या प्रतिकृती, प्राण्याचे चित्र, जुन्या काळातील अवशेषांचे
दर्शन या ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला घडत असते. मात्र आपल्यापैकी अनेक जण ह्याच
भव्य वास्तूंचे दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिकडे आपल्याच नावाची प्रदर्शने मांडून
येतात. काहीना
ही सवय अगदी लहानपणापासून असते. शाळेत
असताना बाकावर कोरीव बरेच जण करत असतात.
शाळेतल्या बाकावर प्रेमाची निशाणी म्हणून कोरलेला
तो 'दिल' त्यावर लिहलेली नावे, या सगळ्या गोष्टी बाकापासून
ते भव्य वास्तूच्या किल्ल्यापर्यंत लिहनारे अनेक जण आहे. चित्रपटातल्या संवादापासून पासून ते लैला-मजनू
हिर-रांझा पर्यंत सर्वाना आदर्श मानून
स्वत;च्या प्रेमाची निशाणी देणारे ही अनेक लोक आहेत. जे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या
स्थळांचे गांभीर्य विसरताना दिसतात. काही महिन्यापूर्वी माझा जुन्नर येथील शिवनेरी किल्यावर जाण्याचा योग
आला होता. लहानपणी तिथे सहल हीं गेली होती . या किल्याची ऐतिहासिक
पाश्वभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य. महाराष्ट्रातील किल्ले आणि शिवराय यांचे नाते अतूट आहे. अशा अनेक गोष्टीमुळे
शिवनेरीचा दर्जा महत्वपूर्ण आहे. ऐतिहासिक काळात बचाव आणि चढ़ाई साठी अत्यंत उपयुक्त असलेली ही
बलवंत स्थाने आज मात्र दुर्दशेच्या गर्तेत सापडली आहेत. मी शिवनेरीला गेले असताना तिकडे पिकनिकला
आलेल्या एका ग्रुपच्या मुलाने त्याचे नाव आणि मोबाईल नंबर मोठ्या दगडावर लिहला.या
सार्वजनिक ठिकाणी खाण्याच्या वस्तूचे पॅकेट, रिकाम्या बाटल्या टाकण्याची
सवय तर आपल्याला आहेत.पण तू माझी होशिल का? आशिक, बाबू ,,बेबी ,,बाबा,, लिहिण्याची गरज काय? अशाने तुमचे प्रेम अमर होईल किवा जगजाहीर होईल
अशी तर कल्पना नसेल ना या लोकांची? फक्त शिवनेरीच नाही ,तर औरंगाबादच्या अजिठा-वेरूळ लेण्या,बीबी का मकबरा, ताजमहाल अशा पाहिलेल्या अनेक ठिकाणी हाच प्रकार घडतो जर कोणी लहान मुलं असा
करत असेल तर आपण ओरडू तरी शकतो पण तरुण-तरुणी मोठीमोठी माणसेच अशी वागू लागली तर
येणाया पिढीला आपण या शौर्यवीराच्या कथा सांगणार की त्यावर केलेली रंगरंगोटी दाखवणार? सहज सुट्टीच्या वेळी लोक बाहेर फिरण्यासाठी जेव्हा गड-किल्यांवर
जातात, आणि कोणी विचारलं कि काय बघितलं तिकडे तर अनेक लोक काही नाही, सगळं पडलं आहे.
बघण्यासारख काहीही नाही अशी निराशाजनक उत्तरे देतात. तेव्हा त्यांना सांगूशी वाटत
कि भले ही आज आमचे किल्ले थोडे ढासळले असतील पण महाराष्ट्राची शान म्हणून ताठ
मानेने उभ्या असणारा तोरणा, सिंधूदुर्ग, रायगड, सिंहगड, कळसुबाई, शिवनेरी अशा अनेक
किल्यांचा आपल्याला अभिमान हवाच. शेकडो किल्यांचा हा खजिना आपला आहे, त्याला जमण्याची
जिमेदारीदेखील आपली आहे.
आपण फक्त किल्यावर मंदिरावर मोठमोठ्या वास्तूवर
लावलेल्या त्या नोटिसा वाचण्याचा कंटाळा येऊन त्त्यांचे फोटो काढतो .मात्र आपणच आपल्या
ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्याचा अपमान करतो आणि स्वताच्या देशाची प्रतिमा मलीन करतो.
त्याचा कधी विचार केला आहे.?? आपण या स्थळावर भेट देण्यासाठी जातो. इतिहासातील या वास्तू उत्तम
शिल्पकारची चित्रकाराची ओळख करून देतात. वर्षानुवर्ष ऊन-पाऊस
सोसणाऱ्या या किल्ल्यांना काही होत नसून उत्कृष्ठ बांधकामाची पोच पावती आपल्याला
या वास्तू देतात. पण या ठिकाणी जाऊन लोक
त्याच्या प्रेमाची आठवण प्रियकर प्रेयसीची नावे मोबाईल क्रमांक देऊन काय साध्य करण्याच्या
विचारात असतात हे मला काही समजत नाही?
सध्या सगळीकडे स्वच्छता अभियानाचे वारे सुरु आहेत.
गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत लहान मोठे कार्यकर्ते, अधिकारी कर्मचारी स्वच्छता
अभियान राबून आपआपल्या परिसरात स्वच्छ करण्याच्या मागे आहेत. माझ्या या लेखातून मला
हेच पोहचवायचे आहे. आपण वेगवेगळ्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करतो. मराठ्यांच्या
पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकताच मराठी माणूस मान उंचावतो. मग ऐतिहासिक वास्तूचा खजिना आपल्याजवळ असताना, आपला असताना, यावर फालतू विनोद मजकूर
लिहून का आपण आपली शोभा करून घेतो? यानंतर तरी असे काही होणार नाही याची शपथ घेऊन येणाऱ्या पिढीला
आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून देण्याची जबाबदारी आपणच घेऊया....
आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा आणि या
करता तरुणांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे. शहाजहान ने मुमताज साठी ताजमहाल सारखी
भव्य वास्तू बांधून त्यांचे प्रेम व्यक्त केले. आपण याचे कौतुक करू, हवा तर फोटो ही काढू मात्र
इतिहासातील खरेखुरे साक्षीदार बनून त्यावर स्वताच्या प्रेमाची कबुली देण्याची गरज
अजिबात नाही. या कोरिव कामाने आपण स्वताला बदनाम करून घेतोय याचा विचार जरूर करा. आपले
किल्ले ऐतिहासिक वास्तू हि आपली शान आहे. विदेशी पर्यटक या वास्तू चे कौतुक करतात.
स्थापत्य कलांचे उत्तम उदाहरण देणाऱ्या या वास्तूची देखभाल
आपल्यालाच करायला हवी ना.! आपणच आपल्या अभिमानास्पद ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य
जपायला हवे ना ! तर चला. आता आपण या क्षणापासून शपत घेऊया आणि आपली ऐतिहासिक
पर्यटनस्थळे स्वच्छ,सुंदर आणि पवित्र राहतील, अशी शपत घेऊया.

कल्याणातील वाडा संस्कृती
कल्याणातील
वाडा संस्कृती
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याण शहरात ५०-६० वर्षा
पर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व जपत मुलांवर ,तरुणांवर सुसंस्कार घडवत वाडा
संस्कृती नांदत होती.
विविध क्षेत्रात जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवलेली अनेक
मंडळी या वाडा संस्कृतीतच वाढली स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
,अर्थतज्ञ भारताचार्य वैद्य ,वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी भारताबाहेर जाणाऱ्या पहिली बारतीय महिला डॉ.आनंदी गोपाळ आदींचा
उल्लेख करावा लागेल .
कल्याण शहरातील वाड्यांची बांधणी वेगळ्या पद्धतीची असली तरी प्रत्येक
वाड्यात ओसरी, मोकळी जागा ,विहीर व वाड्याभोवती भिंत असायायचीच .शिवकाळातव
पेशवेकाळात या वाड्याना विशेष महत्व प्राप्त झाले होते. कल्याण शहराचा ज्या
प्रमाणात विस्तार आणि विकास होत गेला त्या प्रमाणात येथल वाडे नष्ट होऊन नवीन
कल्याण बसवताना विहिरी गेल्या .मोठा मोठी संकुले
तोवर उभी राहिली आणि वाद संस्कृतीऐवजी नवी ब्लोकसंस्कृती निर्माण झाली.
तरीही या वाड्यांचे महत्व कमी झाले नाही त्याचां कल्याणाला आजही अभिमान आहे.
कल्याणची जडणघडणही या वाडा संस्कृतीतुनच झाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)